शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा शिवसैनिकांना ऊर्जा देणार?, चिपळुणातही होणार जाहीर सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 17:51 IST

चिपळूण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस कोकण दौऱ्यावर येत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ...

चिपळूण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस कोकण दौऱ्यावर येत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात ठाकरे काय बोलणार, चिपळूणची जागा आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला दिली जाणार, विरोधकांवर काय टीका करणार याकडे शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतही उत्सुकता आहे. पक्षफुटीनंतर पक्षातच राहिलेल्या लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी हा दौरा यशस्वी ठरणार का, याकडे आघाडीसह युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू झाला असून, रायगड जिल्ह्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. ४ रोजी सिंधुदुर्ग आणि ५ फेब्रुवारी रोजी ते रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. या दौऱ्यात ते विधानसभा मतदार संघ निहाय जाहीरसभा घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत संवाद बैठका घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी व चिपळुण मतदार संघात ते ५ रोजी सभाा घेणार आहेत.५ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली त्याचे पडसाद कोकणातही उमटले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला आहेत. या दोन जिल्ह्यातील तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे बालेकिल्ल्यातही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता प्रथमच उद्धव ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर येत आहेत.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात त्यांचे संवाद बैठका होणार असून त्याची जय्यत तयारी शिवसैनिक करत आहेत. या दौऱ्याबाबत शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून आतापासूनच इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, त्यासाठी जिल्ह्यातील बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश होणार का,  खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा संधी मिळणार का, यावरूनही खलबते सुरू आहेत. याबाबत उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्यात काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, आमदार राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईबाबात ठाकरे महायुतीच्या सरकारवर टीका करण्याची शक्यता असल्याने त्याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

चिपळूणसाठी अनेक इच्छुकविधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मोठी स्पर्धा आहे. आघाडीतील तीनही पक्षांनी चिपळूण विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशांत यादव यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणाही पक्षाने केली अहे. ठाकरे शिवसेनेतही अनेक इच्छुक आहेत. त्याबाबत उद्धव ठाकरे काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख पद बराच काळ रिक्त ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख पद सुधीर मोरे यांच्या निधनानंतर कित्येक महिने रिक्त आहे. मातोश्री वरून निघणारे आदेश, पक्षाचे कार्यक्रम, पक्षाची धोरणे स्थानिक पातळीवर जिल्ह्यात आणि तालुक्यात पोहचवण्याचे अत्यंत महत्वाची जबाबदारी संपर्कप्रमुखांकडे असते.

निवडणुकांमध्ये त्यांची जबाबदारी फार महत्वाची ठरते, आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेले असताना हे पद रिक्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख पदाच्या नावाची घोषणा करणार का, याकडे देखील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

  • उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा रायगडपासून सुरू
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा मतदार संघनिहाय भेटी.
  • जाहीर सभांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद.
  • पक्षफुटीनंतर ठाकरे यांचा पहिलाच दौरा असल्याने ठाकरे शिवसेनेसह विरोधकांमध्येही उत्सुकता
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाChiplunचिपळुण