शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत: उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 16:32 IST

Uddhav Thackeray, Koynadam, Chiplun, Ratnagiri आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला.

ठळक मुद्देकोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत : उद्धव ठाकरेजलविद्युत केंद्राची मुख्यमंत्र्याकडून पाहणी

चिपळूण : आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला.यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर धरण बांधून पाणी आडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० मेगावॅट वीज निर्मिती केली जाऊ शकते.

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./टरएइ) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो. हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथाटप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पध्द्तीने १००० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते.जलविद्युत केंद्राच्या पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणीवेळी मुख्यमंत्रयांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीKoyana Damकोयना धरण