शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक कामाला गती न आल्यास कारवाई- उदय सामंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:41 IST

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामासाठी योग्य नियोजन करावे, ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, अन्य अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी करून ठेकेदाराला इशारामहिनाभरात कामात प्रगती दिसली नाही तर कारवाई करणार

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामासाठी योग्य नियोजन करावे, महिना, दीड महिन्यात कामाबाबत प्रगती न दिसल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.रत्नागिरी एस. टी. बस स्थानकाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. रेंगाळलेल्या बसस्थानकाच्या कामाबाबत प्रवासी व जनतेतून वारंवार तक्रारी येत असल्याने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी बसस्थानकाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच एस. टी. महामंडळाच्या कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, विभाग नियंत्रक सुनील भोकरे, सहाय्यक विभागीय वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला शहर संघटक मनीषा बामणे आदी उपस्थित होते.मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला विविध कारणांनी विलंब झाला आहे. यापुढील काळात तसे होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी केली. बसस्थानकाच्या कामामुळे नागरिक आणि प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी स्थानकासमोर मुख्य मार्गावर उभे असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

यासाठी लगेच दुसऱ्या ठिकाणावरुन बस सुटतील, याची व्यवस्था करा, त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित देण्याचे आश्वासन दिले. एक ते दीड महिना कालावधीत बांधकाम प्रगतीपथावर दिसले नाही तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बसस्थानकाच्या सुरू असलेल्या कामावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची सूचना केली. त्यासाठी मान्यताही दर्शविण्यात आली. त्यामुळे आता या कामाला अधिक गती येण्याची अपेक्षा केली जात आहे.जिल्हाधिकारी यांनी घेतली तातडीने बैठककामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली व विविध विभागांना सूचना दिल्या. या बैठकीला कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, तहसीलदार शशिकांत जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीstate transportएसटी