शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दोन कोकणकन्यांनी सायकलने गाठले गुजरात!, प्रवासाचे नियोजन अन् पोहचायला किती दिवस लागले..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:22 IST

भरधाव वेगात जाणारी वाहने, शिवाय बोचरी थंडी आणि सततची वर्दळ अशा स्थितीत गाठले अंतर

चिपळूण : जिद्द, चिकाटीच्या जोरावर धाडसी पाऊल उचलत चिपळुणातील दोन सुकन्यांनी तब्बल ८०० किलाेमीटरचे अंतर सायकलने पार करत गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंतचा प्रवास केला. एवढ्या लांब पल्ल्याचे अंतर सायकलने पार करणाऱ्या कोकणातील या दोघी पहिल्याच असून, त्यांच्या या धाडसाचे चिपळूणवासीयांकडून कौतुक होत आहे.  चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्य असणाऱ्या धनश्री गोखले व डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिल्यास ठाणे ते अहमदाबादच्या दिशेने जाणारा हा एक्स्प्रेस हायवेलगत असून, त्यावरून भरधाव वेगात जाणारी वाहने, शिवाय बोचरी थंडी आणि सततची वर्दळ अशा स्थितीत गोखले व गणपत्ये यांनी २१ जानेवारी रोजी प्रवास सुरू केला. त्यांचा खरा प्रवास ठाण्यातून सुरू झाला.दररोज त्या दीडशे किलोमीटर अंतर सायकलने पार करत ठाणे, वापी, अंकलेश्वर त्यानंतर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अशा टप्प्यात त्यांच्या प्रवासाचे नियोजन होते. अखेर तीन दिवसांनी अथक प्रयत्नानंतर २३ जानेवारी रोजी त्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याठिकाणी जाऊन पोहोचल्या. धनश्री गोखले यांनी यापूर्वी अहमदाबाद एक्स्प्रेस हायवेवरून सायकलने प्रवास केल्याने तो अनुभव त्यांच्याजवळ होता.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत पोहाेचल्यावर धनश्री गोखले व डॉ. अश्विनी गणपत्ये यांच्या चेहऱ्यावर ध्येय गाठल्याचे अनोखे समाधान उमटले हाेते. त्यानंतर पुन्हा त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्या दोघी चिपळुणात येताच त्यांचे स्वागत करण्यात आले.  यावेळी त्यांनी आपला प्रवास कथ केला.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत सायकलने जाण्याचा अनुभव अभूतपूर्व होता. इतक्या दूरवरचा प्रवास सायकलने पार करण्यासाठी निश्चित सराव हवाच. यासाठी चिपळुणातील ग्रामीण भागातील रस्त्याचा आधार घेतला. महिलाही सायकलने इतक्या दूरवर प्रवास करू शकतात, हे यातून सिध्द झाले. चिपळुणातील महिलांनीसायकलिंग करावे, यासाठी एक महिलांचा सायकलिंग क्लब आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे. - धनश्री गाेखले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGujaratगुजरातWomenमहिलाCyclingसायकलिंग