लांजात दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST2021-03-18T04:31:14+5:302021-03-18T04:31:14+5:30

लांजा : घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चालू असल्याने नजीकच असलेल्या शाळेजवळ ठेवलेली दुचाकी चोरीला गेली असल्याची तक्रार वाघ्रट येथील ...

Two-wheeler theft in Lanza | लांजात दुचाकी चोरी

लांजात दुचाकी चोरी

लांजा : घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चालू असल्याने नजीकच असलेल्या शाळेजवळ ठेवलेली दुचाकी चोरीला गेली असल्याची तक्रार वाघ्रट येथील एका तरुणाने दिली आहे.

तालुक्यातील वाघ्रट बौद्धवाडी येथील मंगेश मधुकर कांबळे (३०) याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी त्याने आपली टीव्हीएस दुचाकी (एमएच ०८ एडब्ल्यू ६४६९) नजीकच्याच एका शाळेजवळ उभी करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कामाला जाण्यासाठी निघताना आपली दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तातडीने कोल्हापूर येथे कामाला जायचे असल्याने कुणीतरी गाडी घेऊन गेले असेल, झाली की आणून देतील, या भरवशावर ते कोल्हापूरला गेले. दोन दिवसांपूर्वी ते परत आले. मात्र दुचाकी कुणीही आणून ठेवली नसल्याने अखेर त्यांनी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Two-wheeler theft in Lanza