दापाेली - खेड मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST2021-04-06T04:30:48+5:302021-04-06T04:30:48+5:30

दापाेली - खेड मार्गावर झालेल्या अपघातानंतर संजय कदम यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. लाेकमत न्यूज नेटवर्क दापाेली : दापाेली ...

Two-wheeler injured in Dapali-Khed road accident | दापाेली - खेड मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार जखमी

दापाेली - खेड मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार जखमी

दापाेली - खेड मार्गावर झालेल्या अपघातानंतर संजय कदम यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापाेली : दापाेली - खेड मार्गावर बाेलेराे गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार संजय कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या दुचाकीस्वाराला आपल्या गाडीतून दापाेलीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संजय कदम यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्या स्वाराचे प्राण वाचण्यास मदत झाली.

दापोली

- खेड मार्गावर बाेलेराे आणि दुचाकी यांच्यात अपघात हाेऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला हाेता. अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्यातच रक्ताच्या थाराेळ्यात पडला हाेता. त्यावेळी स्वाराला तातडीने उपचार मिळणे गरजेचे हाेते. मात्र, पाेलिसी त्रासामुळे काेणीही मदतीला धावून आले नाही. त्याचवेळी या अपघाताची माहिती माजी आमदार संजय कदम यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन स्वाराला आपल्या गाडीतून उपचारासाठी दाखल केले. संजय कदम यांच्या या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचण्यास मदत झाली. संजय कदम यांनी दाखविलेल्या माणुसकीचे काैतुक हाेत आहे.

Web Title: Two-wheeler injured in Dapali-Khed road accident