शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 3:18 PM

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देपोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यूसंगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील घटना, दोघांचेही मृतदेह हाती

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.सुजय आणि अमित हे दोघेही शनिवारी दुपारी १२ वाजता आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन बाहेर निघून गेले. यानंतर ते संध्याकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. ते पोहायला गेले असावेत, अशी शंका आल्याने त्यादृष्टिने काहींनी शोध सुरू केला. त्यानुसार आंगवली बावनदी पात्रातील विठाबाई - कासार कोळवण पुलाजवळ नदीशेजारी त्यांची दुचाकी व काही वस्तू आढळल्या. त्यानंतर नदीत शोधमोहीम सुरु करण्यात आली. रविवारी सकाळपर्यंत त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने याची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांना शोधासाठी बोलावण्यात आले. त्यांनी पहिला मृतदेह ११. ३० वाजता शोधून काढला. याच वेळी देवरुखमधील राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे गणेश जंगम, अण्णा बेर्डे, राजा गायकवाड, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, विशाल तळेकर, सिध्दू वेल्हाळ, निरंजन बेर्डे, प्रवीण परकर, वरद जंगम, पराग लिंबूकर, दीपक गेल्ये तेथे आले. त्यांनीही शोधकार्यासाठी मदत केली. दुपारी दीडच्या सुमाराला दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हातीव व कासारकोळवणमधील ग्रामस्थांनीही शोधकार्यात मदत केली.दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल व्ही. डी. मावळणकर हे करत आहेत.लॉकडाऊमुळे गावीयातील अमित माईन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. या क्षेत्रात त्याला नाव कमवायचे होते. तर सुजय हा कामासाठी दोन दिवसांनी मुंबईत जाणार होता. मोठी नोकरी करून तोही आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणार होता. या घटनेने दोघांची स्वप्न अधुरी राहिली आहेत.दोघे बालंबाल वाचलेया घटनेत मृत झालेले दोघे आणि त्यांचे दोन भाऊही त्यांच्या सोबत पोहायला जाणार होते. मात्र, या दोघांना घाई लागल्याने ते पुढे निघून गेले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ते दोघे भाऊ तिथे पोहोचले. मात्र, फक्त दुचाकी दिसत होती. अमित आणि सुजयचा पत्ता नसल्याने त्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली त्यानंतर शोधमोहीम सुरु झाली. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी