अल्पवयीन मुलीला वेश्या व्यावसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात

By संदीप बांद्रे | Updated: April 14, 2024 23:40 IST2024-04-14T23:40:10+5:302024-04-14T23:40:45+5:30

नातेवाईक असल्याचा आरोपीने घेतला गैरफायदा : शहरात खळबळ

Two persons are detained for inducing a minor girl to engage in prostitution | अल्पवयीन मुलीला वेश्या व्यावसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यावसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात

चिपळूण : शहर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी महिलेसह दोघांना येथील पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे.  हा प्रकार मार्च ते एप्रिल दरम्यान घडला असून  हा प्रकार उघडकीस येताच शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

     पीडित अल्पवयीन मुलगी आरोपी महिलेची नातेवाईक आहे. तिचे आई-वडिल घरी नसताना ती त्या मुलीला लॉजवर घेऊन जात असे. काही वेळा मद्यपान करून ती मुलीला हा व्यवसाय करण्यास भाग पाडत असे. चिपळूणसह रत्नागिरी, खेड, लोणावळा आदी ठिकाणच्या लॉजवर पीडितेला नेऊन आत्याचार करण्यात आले होते. सातत्याने होत असलेल्या अत्याचाराने ही पीडित मुलगी कंटाळली होती. अखेर नरकयातनातून आपली सुटका करण्यासाठी तिने चिपळूण पोलीस स्थानक गाठले. तिने आरोपीविरुद्ध तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर रात्री उशिरा एका आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

     या घटनेचे वृत्त समजताच शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two persons are detained for inducing a minor girl to engage in prostitution