शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकडे फणस घेऊन जाणारा टेम्पो उलटून सिंधुदुर्गातील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 17:04 IST

वटपौर्णिमेसाठी भांडूप - मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून सिंधुदुर्गातील दोघांचा मृत्यू झाला.

 रत्नागिरी  - वटपौर्णिमेसाठी भांडुप - मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून सिंधुदुर्गातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गाला पर्यायी पाली - निवळी बावनदी या रस्त्यावर काल (शनिवारी) रात्री ११.४५ वाजण्याच्या दरम्याने शेल्टेवाडी येथे घडली. देवेंद्र आत्माराम बिड्ये व जयवंत कृष्णा बिडये असे मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नाव असून अन्य चौघे जखमी झाले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-बिड्येवाडी (ता. कणकवली) येथून आयशर टेम्पो (एमएच-०७-एक्स-१७९०) घेऊन चालक अनिकेत लक्ष्मण बिड्ये कणकवली येथून रात्री ८ वाजताच्या दरम्यान भिवंडी - मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. पाली येथे आल्यावर मुंबई - गोवा महामार्गाला पर्यायी पाली - निवळी बावनदी या रस्त्याने जात होता. रात्री ११.४५ वाजण्याच्या दरम्यान निवळी - शेल्टेवाडी येथे आल्यावर रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. त्यातच उतारावरील अवघड वळणावर चालकाने ब्रेक केले असता बाजूला उलटला. 

यामध्ये ट्रकच्या मागील हौद्यामध्ये बसलेले हमाल देवेंद्र आत्माराम बिड्ये (४७)  व जयवंत कृष्णा बिड्ये (४५) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. तसेच या टेम्पोतून प्रवास करणारे इतर हमाल विठ्ठल विजय बिड्ये, लक्ष्मण बिड्ये, आश्विनी बिड्ये, अनिकेत बिड्ये, राजेश तांबे (सर्व रा. नांदगाव, बिड्येवाडी) हे जखमी झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी