रत्नागिरी : दोन वेगवेगळ्या घटनांत अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन बिबटे ठार झाले आहेत. लांजा तालुक्यातील वाकेड-लक्ष्मी बाग व संगमेश्वर तालुक्यातील ढाेलेवाडी येथे हे अपघात झाले आहेत.मुंबई-गाेवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील वाकेड-लक्ष्मी बाग येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटनामंगळवारी पहाटे ३:३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. हा बिबट्या एक ते दीड वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. राजापूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर भांबेड येथील शासकीय नर्सरीमध्ये त्याचे दहन करण्यात आले आहे.
असुर्डे येथे बिबट्याचा बछडा मृतसंगमेश्वर तालुक्यातील असुर्डे ते चाळकेवाडी रस्त्यावर ढाेलेवाडी येथे मंगळवारी सकाळी नर जातीचा अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. अज्ञात वाहनाच्या धडकेने या बछड्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. असुर्डे येथील राकेश जाधव हे आपल्या चारचाकीने या रस्त्यावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला बछडा पडलेला दिसला.बछड्याभाेवती आईची फेऱ्याज्या ठिकाणी बछडा मृतावस्थेत पडला हाेता, त्याठिकाणी बाजूच्या झुडपातून अचानक बिबट्याने थेट त्या पिल्लाच्या ठिकाणी झेप घेतली. बिबट्या सैरावैरा त्या बछड्याच्या अवतीभवती फिरत हाेता. बछड्याच्या जाण्याने दुःखाने जणू ती मादी बिबट्या दु:खी झाली होती. ती मादी वारंवार रस्त्यावर धाव घेत होती, असे प्रत्यक्षदर्शी राकेश जाधव यांनी सांगितले.
विहिरीत पडलेला बिबट्या १५ मिनिटांत पिंजऱ्यात जेरबंदरत्नागिरी तालुक्यातील कोतवडे-बौद्धवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या बिबट्याला अवघ्या पंधरा मिनिटांत पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.भक्ष्याचा पाठलाग करताना पडला. हा बिबट्या नर जातीचा असून, तो ९ ते १० वर्षे वयाचा आहे. विहिरीवर शेडनेट टाकलेले असून, भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे.