शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील घरफोडीप्रकरणी दाेघांना अटक, २६ ताेळे साेने हस्तगत

By अरुण आडिवरेकर | Updated: March 31, 2023 13:57 IST

रत्नागिरी शहर पोलिस स्थानक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातर्फे या प्रकरणाचा तपास सुरू हाेता

रत्नागिरी : शहरातील मांडवी राेड येथील घरकूल अपार्टमेंटमधील घरफाेडीप्रकरणी दाेघांना पाेलिसांनी २५ मार्च राेजी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ३० हजार रुपयांचे २६ ताेळे साेने आणि राेख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा तिसरा साथीदार अजूनही फरार आहे. या चाेरीतील दागिने चाेरट्यांनी शेजारील जिल्ह्यातील एका साेनाराच्या दुकानात विकल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे.ही चाेरी २७ जानेवारी २०२३ राेजी घडली हाेती. रत्नागिरी शहर पाेलिस स्थानक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने या चाेरीतील चाेरट्यांना अटक केली. मांडवी रोड येथील घरकूल अपार्टमेंटमधील एका घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून बेडरुममधील एकूण २६ तोळे सोने व ३० हजार रोख रक्कम चोरण्यात आली होती. रत्नागिरी शहर पोलिस स्थानक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातर्फे या प्रकरणाचा तपास सुरू हाेता.या गुन्ह्यामध्ये एका संशयित महिलेसह एकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते. त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता दागिने शेजारील जिल्ह्यातील साथीदाराच्या मदतीने एका सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे २७ मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील तपास पथकाने शेजारील जिल्ह्यात जाऊन गुन्ह्यातील तिसऱ्या संशयिताचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.

परंतु, गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने विक्री केलेल्या सोनाराचे दुकान दाखविले. या सोनाराकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या दाेघांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या महिलेच्या, (शेजारील जिल्ह्यामधील) अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे.ही कामगिरी पाेलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, हेड काॅन्स्टेबल प्रसाद घोसाळे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, पाेलिस नाईक संकेत महाडिक, मनोज लिंगायत, आशिष भालेकर, पंकज पडेलकर आणि विनय मनवल यांनी बजावली. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस