शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

खेड दरोड्यातील मुख्य आरोपीसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:43 IST

थरारक पाठलाग करुन रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड येथील ५९ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणाचा सूत्रधारासह अन्य दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून रोख २८ लाखांसह ३३ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. लुटीतील रोकड घेऊन गोव्याकडे जाण्याचा या चोरट्यांचा प्लॅन पोलिसांच्या कामगिरीमुळे उधळला गेला आहे.

ठळक मुद्देखेड दरोड्यातील मुख्य आरोपीसह दोघांना अटकपोलिसांच्या कामगिरीमुळे चोरट्यांचा प्लॅन उधळला

रत्नागिरी/खेड : थरारक पाठलाग करुन रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड येथील ५९ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणाचा सूत्रधारासह अन्य दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून रोख २८ लाखांसह ३३ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. लुटीतील रोकड घेऊन गोव्याकडे जाण्याचा या चोरट्यांचा प्लॅन पोलिसांच्या कामगिरीमुळे उधळला गेला आहे.या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. गुरूवारी आणखी तिघांना अटक झाल्यामुळे आता १४ पैकी १२ संशयित गजाआड झाले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक सातारा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी आरोपींचा शोध घेत होते.

गुरूवार, दि. १ रोजी यातील मुख्य सूत्रधार आरोपी किशोर उर्फ बिहारी रघुनाथ पवार (३६, हर्णै, ता. दापोली) व त्याचे साथीदार सत्यवान जनार्दन साळुंखे (२९, सर्वे, ता. श्रीवर्धन), सचिन लहू जाधव (३०, मूळ पानशेत, पुणे, सध्या हर्णै, ता. दापोली) कारने गोव्याला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचून थरारक पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून २८ लाख ५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम, कार, मोबाईल असा एकूण ३३ लाख ९ हजार ४४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस हवालदार संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, राकेश बागुल, पोलीस नाईक विजय आंबेकर, सागर साळवी, उत्तम सासवे, अमोल भोसले, दत्ता कांबळे, रमीज शेख, महिला हेडकॉन्स्टेबल अपूर्वा बापट यांनी केली. या शोधपथकाचे पोलीस अधीक्षक डॉ़ गर्ग व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी