निवडणूक खर्च सादरीकरणासाठी 'ट्रू वोटर ॲप' अनिवार्य
By शोभना कांबळे | Updated: November 2, 2023 17:47 IST2023-11-02T17:46:54+5:302023-11-02T17:47:37+5:30
रत्नागिरी : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना ‘ट्रू वोटर ॲप’चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य ...

निवडणूक खर्च सादरीकरणासाठी 'ट्रू वोटर ॲप' अनिवार्य
रत्नागिरी : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना ‘ट्रू वोटर ॲप’चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणुकीचा निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे. खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ‘ट्रू वोटर ॲप’चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यासाठी गुगल/ॲपल प्लेस्टोअर वरुन ‘ट्रू वोटर ॲप’ डाऊनलोड करुन त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे. सर्व संबंधित तहसिलदार, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक लढविणारे उमेदवार (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) यांनी याची नोंद घ्यावी, असेही उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी कळविले आहे.