शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Accident: भाट्ये येथे टेम्पाेवर ट्रक पलटला, टेम्पाेचालकाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 19:02 IST

तन्मय दाते रत्नागिरी : रत्नागिरी - पावस मार्गावरील भाट्ये येथील अवघड वळणावर पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा हत्ती ...

तन्मय दातेरत्नागिरी : रत्नागिरी - पावस मार्गावरील भाट्ये येथील अवघड वळणावर पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा हत्ती टेम्पाेवर पलटी झाल्याची घटना आज, मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. ट्रकखाली अडकलेल्या टेम्पाेतील चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु हाेते. मात्र, टेम्पाेत अडकून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.फिनाेलक्स कंपनीतून मालवाहतूक ट्रक (जीजे १६, एयु ५४१५) चालक सुनील कुमार तरसिमलाल ललहाेत्रा (रा. पंजाब) रत्नागिरीच्या दिशेने येत हाेता. हा ट्रक पंजाबच्या दिशेने जात हाेता. तर रत्नागिरीतून पूर्णगडच्या दिशेने सिकंदर गावखडकर छाेटा हत्ती टेम्पाे (एमएच ०८, एपी १३५७) घेऊन जात हाेता. त्यांच्यासाेबत गालिफ पांढरे आणि प्रजाली प्रताप पेटकर (सर्व रा. पूर्णगड) हे प्रवास करत हाेते.भाट्ये येथील अवघड वळणावर मालवाहू ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. हा ट्रक समाेरुन येणाऱ्या टेम्पाेवर पडल्याने टेम्पाे ट्रकखाली अडकून पडला हाेता. टेम्पाेचालकासह प्रवासी अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु हाेते. त्यातील तिघांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, टेम्पाे चालकाचा टेम्पाेत अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू