ट्रक उलटून चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:58+5:302021-06-22T04:21:58+5:30

देवरुख : अचानक गाय समोर आल्यामुळे टाटा ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटना २१ राेजी पहाटे ३ वाजता ...

The truck overturned, injuring the driver | ट्रक उलटून चालक जखमी

ट्रक उलटून चालक जखमी

देवरुख : अचानक गाय समोर आल्यामुळे टाटा ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटना २१ राेजी पहाटे ३ वाजता घडली़ साखरपा-संगमेश्वर मार्गावर सह्याद्रीनगर येथील मार्लेश्वर पेटोल पंपासमोरील या अपघातात चालक जखमी झाला आहे, तर ट्रक मोरीवरून खाली पऱ्यामध्ये काेसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती ट्रक चालक नरेंद्र कृष्णा जाधव (४७, रा. साडवली, जाधववाडी) यांनी दिली. नरेंद्र जाधव हे टाटा ट्रक १५१२ (एचयू ५९३५) घेऊन २० रोजी दुपारी १ वाजता संगमेश्‍वर नजीकच्या डिंगणी येथून सीएनजी गॅस भरून गोकुळ शिरगाव येथे गेले हाेते़ तेथून रात्री १० वाजता कोल्हापूर ते डिंगणी असे परत येत असताना २१ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान मार्लेश्वर पेट्राेल पंपनजीक गाडीसमाेर गाय आली़ त्यामुळे ट्रक मोरीवरून खाली काेसळला. या अपघातात चालक नरेंद्र जाधव यांच्या उजव्या पायाला व डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल डी. एस. पवार करीत आहेत.

-------------------------

देवरुख येथील सह्याद्रीनगर मार्लेश्वर पेट्रोल पंपानजीक ट्रक माेरीवरून खाली काेसळून अपघात झाला़ या अपघातात चालक जखमी झाला असून, गाडीचे नुकसान झाले आहे़

Web Title: The truck overturned, injuring the driver