ट्रकची बाेलेराेला धडक, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:34 IST2021-04-28T04:34:05+5:302021-04-28T04:34:05+5:30

रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या बोलेरोला धडक देऊन अपघात केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. ...

The truck hit Balera, injuring the driver | ट्रकची बाेलेराेला धडक, चालक जखमी

ट्रकची बाेलेराेला धडक, चालक जखमी

रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या बोलेरोला धडक देऊन अपघात केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जखमी बोलेरो चालक सदानंद जनार्दन साळवी (५३, रा. काजुर्ली, गुहागर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच ०८, डब्ल्यू ५०९४) घेऊन हातखंबा ते रत्नागिरी असा येत होते. त्याच सुमारास समोरून येणाऱ्या ट्रक (एमएच १४, एएस ७५३६) वरील चालकाने विरुद्ध दिशेला येऊन साळवी यांच्या बोलेरोला मध्यभागी धडक दिली. या अपघातात साळवी यांना गंभीर दुखापत झाली असून, ट्रकचालकाने पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.

Web Title: The truck hit Balera, injuring the driver