शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी बोगद्यात तिहेरी अपघात, कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला अन् पाठिमागून दोन एसटी बस धडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 18:57 IST

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कंटेनरने अचानक ब्रेक केल्याने पाठीमागून येणारी एसटी बस कंटेनरवर धडकली, तर याच बसच्या ...

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कंटेनरने अचानक ब्रेक केल्याने पाठीमागून येणारी एसटी बस कंटेनरवर धडकली, तर याच बसच्या पाठीमागून दुसरी बस धडकली. तिहेरी अपघातात कंटेनरच्या भागाचे, तर दोन्ही बसेसच्या भागाचे नुकसान झाले आहे. हा अपघात काल, गुरुवारी झाला. त्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती.कंटेनर चालक बाबुभाई नरसिंगभाई (५६, रा. अहमदाबाद, गुजरात) हा कंटेनर (जीए ०५, टी ४२५) घेऊन गोवाच्या दिशेने जात होता. हा कंटेनर कशेडी बोगद्यात आला असता त्याने अचानक ब्रेक केला. त्यावेळी एसटी बसचा चालक प्रकाश प्रल्हाद वीरकर (५४, रा. धनगरनगर, शेगाव, जि. बुलढाणा) हे बस (एमएच १४, बीटी ४३५५) मुंबई ते मालवण अशी घेऊन जात होते. या गाडीत २५ प्रवासी होते. ही बस कंटेनरवर पाठीमागून धडकली. या बसच्या मागून बसचालक संतोष हरमकर (४५, रा. शहापूर, ठाणे) हे ठाणे ते खेड अशी बस (एमएच २० सीजी ४५६३) घेऊन येत होते. या गाडीत ४५ प्रवासी होते. ही गाडी समोरील बसवर धडकली. या अपघातात कंटेनरसह दोन्ही एसटी बसेसचे नुकसान झाले.अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर तब्बल एक तास वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात