शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये तिहेरी अपघात, आठजण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:48 IST

दोन बालके दैव बलवत्तर म्हणून बचावली

चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावर रिगल कॉलेजनजीक भरधाव वेगाने निघालेल्या कारने डमडम आणि रिक्षाला धडक दिली. हा अपघात चिपळूण-गुहागर मार्गावर मंगळवारी (४ जुलै) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास झाला. या तिहेरी अपघातात नऊजण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. डमडममधील २० दिवस व सहा महिन्याची दोन बालके दैव बलवत्तर म्हणून बचावली आहेत. गोवळकोट रोडकडून गुहागरच्या दिशेने जाणारी कार रिगल कॉलेजच्या अलीकडे आली असता समोरून गुहागरकडून येणाऱ्या डमडमला कारने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ही डमडम प्रवाशांसह रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. त्यानंतर भरधाव कारने समोरून येणाऱ्या रिक्षालाही जोरदार धडक दिली आणि रिक्षा पलटी झाली.या अपघातात गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ येथील सुभाष कृष्णा अडूरकर (वय २६), प्रतीक जाक्कर, डमडम चालक अमर मोरे (रा. वेळणेश्वर), सिया अडूरकर हे किरकाेळ जखमी झाले आहेत. तसेच चिमुकल्या मुली रिया जाक्कर व उर्वी जाक्कर या सुदैवाने बचावल्या. उर्वरित लोकांना किरकोळ दुखापत झाली.तसेच रिक्षामधील चालक संजय साबळे (रा. कोंढे माळवाडी) यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात विद्यार्थी रूद्र भारद्वाज हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, तर एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. अपघात झाल्यानंतर या कारच्या चालकाने पळण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना तत्काळ येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. या अपघातात रिक्षा व डमडमचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात