शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

अतिक्रमण हटावच्या चेंडूची टोलवाटोलवीच, रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:22 IST

काही नगरसेवक, राजकीय पुढारी खोके संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचा आरोप रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे हटावच्या चेंडूची संबंधितांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे. नगराध्यक्ष व प्रशासन राजकीय दबाव झुगारून अतिक्रमणे हटवतील व शहर सुशोभित करतील, ही आशा आता नागरिकांनी सोडूनच द्यावी काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण हटावच्या चेंडूची टोलवाटोलवीच, रत्नागिरी नगर परिषदेचा कारभारराजकीय आशीर्वादामुळे शहरात खोके संस्कृती

प्रकाश वराडकर रत्नागिरी : काही नगरसेवक, राजकीय पुढारी खोके संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचा आरोप रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे हटावच्या चेंडूची संबंधितांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे. नगराध्यक्ष व प्रशासन राजकीय दबाव झुगारून अतिक्रमणे हटवतील व शहर सुशोभित करतील, ही आशा आता नागरिकांनी सोडूनच द्यावी काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या काही दशकांमध्ये अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, पदपथावरील खोक्यांची अतिक्रमणे सातत्याने वाढत आहेत. नगर परिषदेत सत्तेत येताना सर्वजण रत्नागिरी शहर सुंदर, सुशोभित करण्याचे वचन देतात. मात्र, सत्ता कोणाचीही असो, खोके संस्कृतीचे विस्तारीकरण सुरूच आहे. गत दोन वर्षांच्या तुलनेत सध्या खोक्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र, त्यामुळे शहरात बकालपणा वाढत आहे, याची फिकीर कोणालाही नाही.रत्नागिरी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे ही गेल्या ४ दशकांपासून आहेत. नगर परिषदेत अतिक्रमणविरोधी पथकही कार्यरत आहे. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी नगर परिषदेकडे स्वतंत्र वाहनही आहे. सध्या या अतिक्रमण विरोधी पथकाला धडाकेबाज अधिकारीही लाभला आहे. मात्र, असे असतानाही या पथकातील कर्मचाऱ्यांचे हात राजकीय दबावाने बांधल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, नगर परिषद प्रशासन या राजकीय दबावातून कधीतरी बाहेर पडतील ही अपेक्षा रत्नागिरीकरांनी ठेवूच नये काय, असा सवाल केला जात आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारी (१४ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर व अन्य विरोधी सदस्यांनी अतिक्रमणांचा विषय आक्रमकतेने मांडला व शहरात तत्काळ अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याची मागणी केली. त्याचवेळी काही नगरसेवक, पुढारी यांचे बेकायदा खोक्यांना अभय असल्याचा आरोपही झाला. यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी उपस्थित सर्व नगरसेवकांच्या सहमतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.यानंतर मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी यासाठी सर्व नगरसेवक व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे मोहिमेचा चेंडू टोलवला जात असल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु, याआधीच्या मोहिमांवेळी कारवाई करण्यास गेलेल्या पथकावर राजकीय दबाव आणला गेला होता. त्यामुळेच मुख्याधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली. मात्र, सर्व नगरसेवक सभागृहात असताना स्वतंत्र बैठकीची गरज नाही, असे सांगून अतिक्रमण हटाव मोहिमेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. मात्र, राजकीय दबाव येऊन पुन्हा या मोहिमेचा फज्जा उडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.बेकायदेशीर टपऱ्या, खोकेरत्नागिरी शहराच्या साळवी स्टॉप या प्रवेशद्वारापासून ते मांडवी व बाजारपेठेतील अनेक भागांमध्ये जेथे जागा मिळेल तेथे खोके, टपऱ्या बेकायदेशीररित्या उभारण्यात आले आहेत. मटक्यासाठी लागणारे खोके मात्र बाजाराकडे पाठ करून उभे आहेत. शहरातील पदपथ विक्रेत्यांनी व्यापले असून, त्यांचा पादचाºयांसाठी उपयोगच होत नाही. होर्डिंग्ज व खोक्यांमुळे बकालपणा वाढला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी