विजय भोसले यांना खेड काँग्रेसतर्फे श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST2021-07-12T04:20:29+5:302021-07-12T04:20:29+5:30

खेड : खेड, दापोली, मंडणगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे खेड नगर परिषद सभागृह येथे ॲड. विजयराव भोसले यांना श्रद्धांजली वाहण्याचा ...

Tribute paid to Vijay Bhosale by Khed Congress | विजय भोसले यांना खेड काँग्रेसतर्फे श्रद्धांजली

विजय भोसले यांना खेड काँग्रेसतर्फे श्रद्धांजली

खेड : खेड, दापोली, मंडणगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे खेड नगर परिषद सभागृह येथे ॲड. विजयराव भोसले यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रदेश चिटणीस इब्राहिम दलवाई, जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते अशोक जाधव, मंडणगड, दापोली, खेडचे अध्यक्ष मुश्ताक मिरकर, भाऊ मोहिते, गौस खतीब, जिल्हा उपाध्यक्ष अनंत जाधव, डॉ. विलास शेळके, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, मंडणगडचे जमीर माखजनकर, आरीफ मुल्लाजी, अनिल सदरे यांनी ॲड. विजय भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी नगरसेवक बशीर मुजावर, माजी शहराध्यक्ष संदीप धारिया, गुलजार कुरवले, खलील फोफळणकर, फैसल देसाई, सिकंदर बुरुड, मंडणगड, दापोली, खेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भोसले यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. यानिमित्ताने कोरोना कालावधीत मृत पावलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Tribute paid to Vijay Bhosale by Khed Congress