शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डे येथे ट्रॅव्हल्सचा अपघात, १६ जण जखमी; मुंबईहून आले होते पर्यटनाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 11:55 IST

चिपळूण : मुंबईतील एका कंपनीतील कर्मचारी आपल्या कुटुंबांसह पर्यटनासाठी मालवणकडे जात असताना ट्रॅव्हल्सला अपघात झाला आणि १६ जण जखमी ...

चिपळूण : मुंबईतील एका कंपनीतील कर्मचारी आपल्या कुटुंबांसह पर्यटनासाठी मालवणकडे जात असताना ट्रॅव्हल्सला अपघात झाला आणि १६ जण जखमी झाले. किरकोळ उपचारानंतर त्यातील १५ जणांना घरी पाठवण्यात आले असून, एका महिलेवर उपचार सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे मच्छी बाजारासमोर शुक्रवारी पहाटे ६ वाजता हा अपघात झाला.मुंबईतील खडपे ट्रॅव्हल्स ही बस रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघात प्रकरणी ट्रॅव्हल्सचा मालक व चालक विनीत विलास खडपे (रा. कांदिवली, पूर्व मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खडपे ट्रॅव्हल्सची ही बस बोरीवलीहून मालवणकडे निघाली होती. मुंबईतील एका कंपनीतील कर्मचारी सुटीनिमित्त या ट्रॅव्हल्सने मालवण येथे फिरायला निघाले होते. सावर्डे येथे ही बस आली असता भटक्या कुत्र्यांचा घोळका अचानक समोर आला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला घेत असताना चालक विनीत खडपे याचा ताबा सुटला आणि बस दुभाजकावरून सर्व्हिस रोडवर उलटली. त्यावेळी मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेत आतील प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका मागवून त्यांना तातडीने डेरवण रुग्णालयात नेले.या अपघातात नितीन विठोबा ठाकूर, स्नेहा नितीन ठाकूर, वेदांत नितीन ठाकूर, शंकर मारुती घुगे, योगेश दत्तात्रय परब, आकांक्षा अशोक सावंत, सुहासिनी दत्तात्रय परब, भक्ती धनंजय पडवळ, रोहित प्रकाश बच्चाव, पूजा राेहित बच्चाव, प्रिशा रोहित बच्चाव, अनुजा अशोक सावंत, अशोक दत्ताराम सावंत, तृप्ती पंकज पचारणे, पंकज विलास पचारणे, स्वामिनी सुखदेव सांगळे जखमी झाले आहेत. यातील सुहासिनी परब (६५) यांच्यावर अजून उपचार सुरू असून, उर्वरित प्रवाशांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी सावर्डे पोलिसांनी चालक विनीत खडपे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात