शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्री, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:16 IST

Mns St Ratnagiri- राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक बसला अपघात होऊन देवरूखातील दोन चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी यांनी जुन्या प्रवासी बसेसच्या सीट काढून त्या गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप केला आहे. अपघातप्रकरणी परिवहन मंत्री, एस. टी.चे विभाग नियंत्रक ट्रॅफिक वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

ठळक मुद्देपरिवहन मंत्री, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा मनसे आक्रमक

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक बसला अपघात होऊन देवरूखातील दोन चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी यांनी जुन्या प्रवासी बसेसच्या सीट काढून त्या गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप केला आहे. अपघातप्रकरणी परिवहन मंत्री, एस. टी.चे विभाग नियंत्रक ट्रॅफिक वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.जुन्या प्रवासी गाड्यांच्या सीट काढून त्या गाड्यांमधून मालवाहतूक केली जाते. नऊ ते दहा टनांपेक्षा अधिक वजनाची अवैधरीत्या मालवाहतूक केली जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष साळवी यांनी केला आहे. चालक-वाहक गाडीच्या अपघाताला जबाबदार नाहीत. मात्र, जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून, या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.जुन्या गाड्यांची मालवाहतूक करण्याची क्षमता नाही; मात्र कोणत्यातरी अध्यादेशाचा आधार घेत कामगारांवर दबाव टाकून त्यांना जबरदस्तीने मालवाहतूक करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर - मेढा मार्गावर मालवाहू बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मालवाहक गाडीचे दोन चालक मयूर पावनीकर व रामकिशन केंडे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही चालक देवरूख आगारातील असून, या दुर्घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अपघाताचा गुन्हा चालकांवर दाखल न करता तो संबंधित अधिकाऱ्यांवर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरीMNSमनसे