शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेती अभियानातून कायापालट

By admin | Updated: January 14, 2015 23:38 IST

पिंपळी गावची निवड : सिंचनाची कार्यक्षमता वाढवणार, शेतीला मिळणार चांगले वाण

सुभाष कदम - चिपळूण  -कोरडवाहू शेती ही सिंचनाच्या सीमित सुविधांमुळे शेतकऱ्यांना न परवडणारी ठरत असली, तरी अशा शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानात चिपळूण तालुक्यातील पिंपळी गाव निवडल्यामुळे अशा शेतीला आता कोकणात प्रोत्साहन मिळणार आहे. अवर्षणप्रवण क्षेत्र व हलकी जमीन यामुळे कोरडवाहू शेती ही अत्यंत जिकरीची व जोखमीची झाली आहे. खरीप पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, रब्बी पीक प्रात्यक्षिके, शेतकरी अभ्यास दौरे, कर्मचारी प्रशिक्षण, शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे व गटप्रमुखांचे प्रशिक्षण इत्यादी घटकांची अंमलबजावणी सुरु आहे. पिंपळी बुद्रुक गावालगत कॅनॉल आहे. त्यामुळे या भागात बारमाही पाणी असते. येथील शेतकऱ्यांना शेतीच्या माध्यमातून आर्थिक लाभ व्हावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. मूलस्थान जलसंधारणासह साखळी बंधारे, शेततळे यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढवणे, शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती, कृषी प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे, कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, शेतकरी गट स्थापना, प्रशिक्षण, शेती शाळा, अभ्यासदौरे यांच्या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणे असा या धोरणाचा हेतू असून, त्यादृष्टीने अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करताना अल्प व अत्यल्प भूधारक, तसेच महिला व मागासवर्गीय शेतकरी यांना प्राधान्य देणे, शेतकरी गटामध्ये सहभागी होऊन गट आधारित उपक्रम राबविण्यास तयार असलेले शेतकरी, मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करणारे शेतकरी, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण पद्धत अवलंब करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड होऊ शकते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कर्मचारी प्रशिक्षण, शेतकरी गट तयार करणे, शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण, शेतीशाळा, शेतकरी अभ्यास दौरा, साखळी सिमेंट नालाबांध, पाईप पुरवठा, डिझेल वा विद्युत पंप पुरवठा, शेततळ्यांचे विस्तारीकरण, सूक्ष्म सिंचन, मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण, कोरडवाहू वाणाची पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, हरितगृह उभारणी, शेड नेट हाऊस उभारणी, दालमिल, भरडधान्य प्रक्रिया सयंत्र, प्लास्टिक स्के्रट, पॅकहाऊस, कृषी मालासाठी वाहन सुविधा, प्रशासकीय संकीर्ण अशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिपंळी येथे या कामाची सुरूवात झाली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे व कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाला सुरूवात झाली आहे. योजना राबविण्यासाठी मंडल कृषी अधिकारी एम. आर. धोत्रे, कृषी पर्यवेक्षक एन. एन. बोडके, कृषी सहाय्यक एल. डी. शिंदे कार्यरत आहेत.