जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:11+5:302021-08-17T04:37:11+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये १ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश ...

Transfers of 5 police officers in the district | जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये १ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

रत्नागिरी ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून असलेले शरद पवार यांची ठाणे शहर याठिकाणी बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नागिरी नियंत्रण कक्ष येथे असलेले शांताराम महाले यांची कोकण परिक्षेत्र येथे बदली झाली आहे तर पैरवी अधिकारी जिल्हा कोर्ट येथे असलेले रोहन दणाणे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची सांगली येथे बदली झाली आहे. लांजा येथे कार्यरत असणाऱ्या श्वेता पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्र येथे बदली झाली आहे तर संगमेश्वर येथे कार्यरत असणाऱ्या प्राची पवार यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे. सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Transfers of 5 police officers in the district