रत्नागिरी जिल्ह्यातील ३ पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 19:57 IST2020-10-01T19:56:09+5:302020-10-01T19:57:39+5:30
राज्य पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बुधवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
रत्नागिरी : राज्य पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बुधवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे बुधवारी १०५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. रात्री उशिराने बदल्यांचे आदेश काढण्यात आले. या बदल्यांमध्ये रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आणि खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांची बदली झाली आहे.
गणेश इंगळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे बदलून जाणार आहेत. त्यांच्या जागी नाशिक येथील कळवण येथील सदाशिव शरणाप्पा वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांची बदली ठाणे शहापूर येथे झाली आहे.
खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांची बदली हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे झाली आहे. त्याचबरोबर अकोला येथील पोलीस मुख्यालयातील उपअधीक्षक शिवाजी लहू पाटील यांची रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.