खड्ड्यामुळे कुंभार्ली घाटातील वाहतूक ५ तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 12:31 IST2021-11-27T12:29:50+5:302021-11-27T12:31:09+5:30

रस्त्यात पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने ही वाहतूक खोळंबली होती. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या

Traffic jam in Kumbharli Ghat for 5 hours | खड्ड्यामुळे कुंभार्ली घाटातील वाहतूक ५ तास ठप्प

खड्ड्यामुळे कुंभार्ली घाटातील वाहतूक ५ तास ठप्प

चिपळूण : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट तब्बल ५ तास ठप्प झाला होता. रस्त्यात पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने ही वाहतूक खोळंबली होती. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास ठप्प झालेली ही वाहतूक पाच तासांनी पूर्ववत झाली.

सह्याद्रीच्या कुशीतील असलेल्या या कुंभार्ली घाटातील एका वळणावर ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यात पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे गेल्या पाच ते सहा तासापासून ही वाहतूक पूर्णत: ठप्प होती. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहन चालकांमधून नाराजीने संताप व्यक्त केला. तर दुधाच्या गाड्या अद्याप न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

गेले अनेक दिवस या घाटात असलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थ करत होते. मात्र, प्रशासनाने लक्ष न दिल्याने ही स्थिती उद्भवल्याचे समोर येत आहे.

Web Title: Traffic jam in Kumbharli Ghat for 5 hours