खेडमधील व्यापाऱ्यांनीही ठेवली सर्व दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:54+5:302021-04-11T04:30:54+5:30

khed-photo102 खेड शहरातील बसस्थानक परिसरात शुकशुकाट पसरला हाेता. (छाया : हर्षल शिराेडकर) khed-photo103 खेड बाजारपेठ निर्मनुष्य झाली होती. (छाया ...

Traders in Khed also kept all the shops closed | खेडमधील व्यापाऱ्यांनीही ठेवली सर्व दुकाने बंद

खेडमधील व्यापाऱ्यांनीही ठेवली सर्व दुकाने बंद

khed-photo102 खेड शहरातील बसस्थानक परिसरात शुकशुकाट पसरला हाेता. (छाया : हर्षल शिराेडकर)

khed-photo103 खेड बाजारपेठ निर्मनुष्य झाली होती. (छाया : हर्षल शिराेडकर)

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला खेड शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शनिवारी सकाळपासूनच खेड बाजारपेठ सुनीसुनी झाली आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात शुकशुकाट दिसून येत आहे.

शहरात पोलीस प्रशासनाने चौकाचौकात बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता. वाहने व नागरिकांनाही अत्यावश्यक नसल्यास प्रवास करण्यास अटकाव करण्यात आला.

शहरातील एस. टी. बस स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, तीन बत्ती नाका, निवाचा चौक, गांधी चौक, वाणी पेठ, महाड नाका आदी ठिकाणी नेहमी गर्दी असते. मात्र, या परिसरातही शुकशुकाट पसरला होता. एस. टी. बसस्थानकातून किरकोळ फेऱ्या सुरू होत्या. मात्र, नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले स्थानक सुनेसुने झाले होते. शहरातील मेडिकल स्टोअर्समध्ये तुरळक वर्दळ पाहायला मिळत हाेती. पण, नियमांचे पालन करूनच औषधांचा पुरवठा केला जात हाेता. महामार्गावरील नेहमीच गजबजणारा भरणे नाका परिसरही शनिवार शांत हाेता.

काेट

खेडमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या राज्य शासनाच्या वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे. शासनाने लागू केलेले निर्बंध व त्याबाबत सुरुवातीला व्यापाऱ्यांनी घेतलेली भूमिका पाहता विकेंड लॉकडाऊनला मिळालेला प्रतिसाद नक्कीच कौतुकास्पद आहे. असाच संयम नागरिकांनी आणखी काही दिवस पाळल्यास कोरोना विरुद्धच्या लढ्यात नक्कीच आपण यशस्वी होऊ.

- प्राजक्ता घोरपडे, तहसीलदार

Web Title: Traders in Khed also kept all the shops closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.