शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली; समुद्रकिनारे गर्दीने फुलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:54 IST

सर्व हाॅटेल्स, लाॅज बुक

रत्नागिरी : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची पावले काेकणाकडे वळली आहेत. त्यामुळे मुंबई - गाेवा महामार्गावर वाहनांची रीघ लागली असून, जिल्ह्यातील गणपतीपुळे, दापाेली, गुहागर येथील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. सर्व हाॅटेल्स, लाॅज बुक झाले आहेत. संपूर्ण जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.नाताळची सुट्टी पडली की, थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक काेकणात दाखल हाेत आहेत. यावर्षीही पर्यटकांनी काेकणाला पसंती दिली आहे. त्यातच शनिवार, रविवार सुटी आल्याने पर्यटक आधीपासून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेसह आरे-वारे, काजिरभाटी त्याचबराेबर मंडणगडमधील वेळास, दापाेलीतील आंजर्ले, हर्णै, मुरुड, लाडघर, कर्दे, दाभाेळ आणि गुहागरातील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी या ठिकाणी माेठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.मुंबई, पुणे, सांगली, सातारा, काेल्हापूर या ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनारी भागाला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर माेठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे या भागातील हाॅटेल, लाॅज फुल्ल झाले आहेत. पर्यटकांमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गजबजून गेली आहेत.

पर्यटक ‘श्रीं’च्या दर्शनालाश्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे दिवसाला २५ ते ३० हजार पर्यटक ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येत आहेत. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांसाठी दोन वेळ मोफत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध आहे. सकाळी व सायंकाळी ३,५०० ते ४,००० भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

शिरगाव परिसरात वाहतूक कोंडीगणपतीपुळे येथे जाण्यासाठी आरे-वारे मार्ग साेयीस्कर आणि सुलभ ठरत आहे. मात्र, शिरगाव येथील अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण हाेत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दोन मोठी वाहने समाेरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. या ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेत आहे. याबाबत पाेलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNew Yearनववर्षkonkanकोकणtourismपर्यटन