शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड पर्यटनस्थळे गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:21 PM

उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने कोकणासह आता जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड आदी पर्यटनस्थळे आता पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. निवासाच्या ठिकाणीच पर्यटकांचे मनोरंजन व्हावे, त्यांचा निवास लांबावा या हेतूने येथील पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध कार्यक्रम सादर करण्यात येत असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देपावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड आदी पर्यटनस्थळे आता पर्यटकांनी गजबजलीपर्यटन विकास महामंडळ : पर्यटक निवासाठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाने मनोरंजन

रत्नागिरी : उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने कोकणासह आता जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड आदी पर्यटनस्थळे आता पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. निवासाच्या ठिकाणीच पर्यटकांचे मनोरंजन व्हावे, त्यांचा निवास लांबावा या हेतूने येथील पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध कार्यक्रम सादर करण्यात येत असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली.कोकणच्या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांना आकर्षण आहे. विशेषत: समुद्रकिनाऱ्यांच्या ओढीने एक-दोन दिवसांसाठी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यात सध्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम. टी. डी. सी) माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. अनेक ठिकाणी तंबू निवासाद्वारे पर्यटकांना राहण्याची सोय करून दिली जात आहे.कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यांकडे आकृष्ट होणाऱ्या राज्य, देश आणि परदेशी पर्यटकांनी काही काळ येथे वास्तव्य करावे, यादृष्टीने त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जलपर्यटन, जलक्रीडा यामधून पर्यटकांना आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा मुख्य हेतू आहे.निवासासाठी पर्यटकांकडून पर्यटन विकास महामंडळाच्या निवासांना प्रथम पंसती दिली जात असल्याने गणपतीपुळे येथे कोकणातील वास्तव्याचा आनंद अनुभवता यावा, यासाठी तंबू निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन महामंडळातर्फे याठिकाणी २६ बांबू निवास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.पर्यटकांचे निवासाच्या ठिकाणी मनोरंजन व्हावे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक लोककलांचे सादरीकरण केले जात आहे. गणपतीपुळे येथे शनिवारी आणि रविवारी या कार्यक्रमांचा आनंद पर्यटकांनी घेतला. तसेच गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथेही पौर्णिमेला कलाकारांचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी