पर्यटन महोत्सवाची रंगत वाढविणार
By Admin | Updated: March 25, 2015 00:46 IST2015-03-24T21:15:31+5:302015-03-25T00:46:23+5:30
भाट्येतील महोत्सव : विविध स्पर्धा घेण्याची घोषणा

पर्यटन महोत्सवाची रंगत वाढविणार
रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये बीच येथे दि. २, ३ व ४ मे २०१५ रोजी होणाऱ्या जिल्हा पर्यटन महोत्सवासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे या महोत्सवात अधिक रंगत भरण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धाची तयारी सुरू आहे. विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन समिती अध्यक्षांनी केले आहे.
यानिमित्ताने कोकणातील कलावंतांना प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळणार असून तयार केलेले लोगो व घोषवाक्य चित्रकृती, छायाचित्रांसह आपल्या प्रवेशिका १५ एप्रिल पूर्वी पाठवाव्यात. घोषवाक्य व लोगो स्पर्धेसाठी आशय ‘रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१५’ असा आहे. घोषवाक्य ६ शब्दांपर्यंत असावे. एका स्पर्धकाने जास्तीत जास्त ५ लोगो किंवा ५ घोषवाक्य पाठवावीत. कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. संबंधित लोगो व घोषवाक्य अन्य उपक्रमात वापरण्याचा हक्क आयोजन समितीकडे राहील. लोगोची सॉफ्ट कॉपी ३१ मार्चपर्यंत १३ल्ल.’ङ्मॅङ्म.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. ई-मेलमध्ये स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्राचे ठिकाण हा तपशील नमूद करावा. घोषवाक्यांची सॉफ्टकॉपी ३१ मार्च २०१५ पर्यंत १३ल्ल.२’ङ्मँल्ल.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. छायाचित्र स्पर्धेचा विषय रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन निसर्ग, पर्यटनस्थळे असा आहे. स्पर्धांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी एका स्पर्धकाने जास्तीत जास्त ए४ आकाराची १० छायाचित्रे पाठवावीत. छायाचित्रावर कुठल्याही प्रकारचे लेखन, नाव, वॉटरमार्क किंवा इतर सजावट नसावी. हार्डकॉपी १५ एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल शाखा) किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय चिपळूण, दापोली येथे कार्यालयीन वेळेत पाठवावी. सॉफ्टकॉपी १५ एप्रिलपर्यंत १३ल्ल.स्रँङ्म३ङ्म.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मेवर पाठवावी. ई-मेलमध्ये स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्राचे ठिकाण हा तपशील नमूद करावा. हार्डकॉपी सोबत छायाचित्र स्वत काढले असल्याचे हमीपत्र द्यावे, स्पर्धेसाठी हार्डकॉपी ग्राह्य धरली जाईल.
चित्रकला स्पर्धेचा विषय रत्नागिरी जिल्हयातील लोकजीवन, निसर्ग, पर्यटनस्थळे असा आहे. स्पर्धांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 0२३५२ २२३६०२, 0२३५५-२५२०४६, 0२३५८-२८२०३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन समिती अध्यक्षांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)