शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:57 IST

गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तीन वर्षांनंतर मुहूर्त मिळाला असून, त्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे तर ५ जानेवारी २०२३ रोजी शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदलीचे आदेश देण्यात येणार आहे.जिल्ह्यात २,५८८ प्राथमिक शाळा असून, त्यामधील सुमारे ७३,५०० विद्यार्थ्यांना ६ हजार शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या.  कारण मागील दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक बदल्या करण्यात आलेल्या नाही. मात्र, शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बदली प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, सुरुवातीला दुर्गम भागातील शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दोन महिने ही  बदल्यांची प्रक्रिया सुरू राहणार आहे.  त्यामुळे दीपावलीच्या सुटीनंतर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची वर्दळ वाढणार आहे.गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्यासन २०१९ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या हाेत्या. त्यावेळी ३,५०० शिक्षकांच्या बदल्या शिक्षण विभागाने केल्या होत्या.  मात्र, त्यानंतर आता शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. तीन वर्षापूर्वीच्या कमी शिक्षकांच्या बदल्या यंदा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुर्गम भागांतील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सुगम भागांतील शाळांमध्ये येण्याची संधी उपलब्ध होणार आहे.जागा भरण्यासाठी राऊंडशिक्षकांचे बदलीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यानंतर ९ रोजी विशेष संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार असून, १० रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तर १३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप असल्यास शिक्षकांना अपिल करता येणार आहे. उर्वरित  प्रक्रियेसाठी सुमारे महिन्याचा कालावधी जाणार असून, २९ डिसेंबरला १० वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० रोजी अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राऊंड घेण्यात येणार आहे.शाळांची यादीसुगम आणि अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते. अवघड क्षेत्राची यादी चुकीची असल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या. मात्र, ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील ६८६ शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याच दिवशी बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक