शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरातील तीन महिलांना १० वर्षाची सक्तमजुरी, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा

By संदीप बांद्रे | Updated: January 25, 2024 17:58 IST

चिपळूण : गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील ...

चिपळूण : गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी तीन महिलांना १० वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ८ हजारा रूपये दंड अशी शिक्षा गुरूवारी ठोठावली.यामध्ये विवाहितेची सासू हिरा मधूकर नाटेकर, जाऊ प्रतिभा नितीन नाटेकर व नणंद पुष्पा रत्नाकर जांभारकर या महिलांचा समावेश आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणात मयत विवाहीत महिलेचा मृत्यूपुर्व जबाब आणि नवऱ्यासहीत ९ जणांची साक्ष महत्वाची ठरली.असगोली खारवीवाडी येथे १४ सप्टेंबर २०१७ रोजी विवाहीता कै. आरती मंगेश नाटेकर हिने स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नाला सुमारे ११ वर्षांचा कालावधी झाला होता. तिला निल नावाचा दहा वर्षाचा मुलगा आहे. पती मंगेश मधूकर नाटेकर हा मुंबई येथे मासेमारीचा व्यवसाय करतो. सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करीत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळही केला जात होता.या सततच्या त्रासाला कंटाळून आरती मंगेश नाटेकर हिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ती ९५ टक्के भाजली होती. तातडीने तिला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी तिने या तिघी विरूद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध ४९८ (अ), व ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. आरती रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतानाच मयत झाली. त्यामुळे या प्रकरणी ३०६ हे वाढीव कलम लावून हा खटला चिपळूण जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होता. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. खटल्यातील मृत्यूपूर्व जबाब आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ याबाबी सिद्ध करण्यासाठी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. सर्व साक्षीपुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच आरतीच्या नवऱ्याने सत्याची बाजू मांडत आपली आई, बहिण व भावजय यांचेविरूध्द दिलेली साक्ष ग्राह्य मानण्यात आली. त्याप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी तिनही महिलांना दोषी ठरवून  कलम ३०६ अन्वये १० वर्षे सक्तमजूरी व ५ हजार रूपये दंड, कलम ४९८ (अ) गुन्ह्यासाठी ३ वर्षे सक्तमजूरी व प्रत्येकी २ हजार रूपये दंड, ५०४ गुन्ह्यासाठी २ वर्षे साधा कारावास व १ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी केला. पोलिस हेड कॉन्स्टेंबल प्रदीप भंडारी यांनी सरकार पक्षास मदत केली. महिलेनेच, महिलेविरूध्द केलेल्या गुन्ह्यामध्ये देखील न्यायालयासमोर सबळ पुरावा आल्यास शिक्षा दिली जाते, असे प्रतिक्रीया सरकारी वकिलांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस