तीन हजार तक्रारी निकाली

By Admin | Updated: April 10, 2015 00:24 IST2015-04-09T23:18:31+5:302015-04-10T00:24:39+5:30

महावितरण : कॉलसेंटरकडून तीन महिन्यात निपटारा

Three thousand complaints were received | तीन हजार तक्रारी निकाली

तीन हजार तक्रारी निकाली

रत्नागिरी : महावितरणने कॉलसेंटरची सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविता येतात. आलेल्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्याची महावितरणची भूमिका दिसून येत आहे. कोकण परिमंडलातील रत्नागिरी विभागातील ३२८४ ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यात तक्रारी नोंदविल्या होत्या. संबंधित तक्रारींची तातडीने दखल घेत ३१८४ तक्रारींचे निवारण केले आहे. तीन महिन्यात केवळ ९८ तक्रारी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.
घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे, मीटर नादुरूस्त झाले आहेत, वीज वाहिन्या तुटल्या आहेत किंवा अन्य वीजेशी संबंधित तक्रारी कॉल सेंटरवर घेतल्यास त्याची दखल घेतली जाते. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून संबंधित प्रभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सजग केले जाते. शिवाय तक्रारीचे निवारण करण्याची सूचना केली जाते.
जानेवारी महिन्यात ९१६ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. पैकी ९१३ तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये ८१७ तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. पैकी ७९७ तक्रारी सोडविण्यात महावितरणला यश आले आहे. मार्च मध्ये कॉलसेंटरवर नोंदविलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. १५५१ तक्रारी नोंदविण्यात आल्या असता १४७६ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्याचा आढावा घेता कॉलसेंटरवर येणाऱ्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. अर्थात ग्राहकही सजग झाले आहेत.
जानेवारी, मार्च या दोन महिन्यातील आलेल्या तक्रारींचे प्रमाण व दाखल झालेल्या तक्रारी सोडविण्याचे प्रमाण अधिक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)

गेल्या तीन महिन्यात नोंदविलेल्या तक्रारी
रत्नागिरी विभागजानेवारीफेब्रुवारीमार्च
चिपळूण ग्रामीण२११३५२
चिपळूण शहरी१११२२१
दापोली (१)२४३२२७३९०
दापोली (२)२४३१६१
देवरूख५१४२११०
गुहागर२३८६०
खेड१११३२३
लांजा६२०१४
लोटे७६७३१४०
मंडणगड५०३९४९
राजापूर (१)१४७२४
राजापूर (२)२२१७३३
रत्नागिरी शहर९१५७५५
रत्नागिरी ग्रामीण (१)१११०२८
रत्नागिरी ग्रामीण (२)२१२६१
संगमेश्वर२३४२४०४१६
सावर्डे७६१४

Web Title: Three thousand complaints were received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.