Three students from the village are happy in China; Contact from the Collector | खेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप ; जिल्हाधिकार्‍यांनी साधला संपर्क

खेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप ; जिल्हाधिकार्‍यांनी साधला संपर्क

ठळक मुद्देचीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही या तीन जणी त्यामुळे घरातच आहेत.

रत्नागिरी : चीनमधील नानटोग प्रांतात नानटोग विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून, त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

या विद्यार्थिनीपैकी सादिया बशीर मुजावर तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ही माहिती त्यांनी दिली खेडमधील सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदूले आणि सादिया बशीर मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये राहत आहेत सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी आहे या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत आहेत

चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही या तीन जणी त्यामुळे घरातच आहेत.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत सादियाशी दूरध्वनीवर संपर्क केला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली त्यांचा सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने चीन मधील भारतीय दूतावासा सोबत पत्रव्यवहार आपण करू व लवकरात लवकर त्यांना भारतात आणू असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यातील जणींना सांगून आश्वस्त केले

Web Title: Three students from the village are happy in China; Contact from the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.