शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

Ratnagiri: मंडणगडात ३० हजारांची लाच घेताना 'महसूल'चे तिघे जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:56 IST

लाचेच्या रकमेचे वाटप

मंडणगड : पत्नीच्या नावे लिलावामध्ये घेतलेल्या शेतजमिनीची फेरफार नोंद करून तसा साताबारा देतो, असे सांगून तब्बल ३० हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यांसह ग्राम महसूल अधिकारी आणि शिपायाला मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन मंडणगड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हाप्रळचे मंडळ अधिकारी अमित शिगवण, सजा म्हाप्रळचे ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे (अतिरिक्त कार्यभार साेवेली) आणि मंडणगड उपकाेषागार कार्यालयातील शिपाई मारुती भाेसले अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे तालुक्यातील मौजे शेणाळे याठिकाणी लिलावामध्ये शेतजमीन खरेदी केली आहे.या जमिनीची फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून करून देतो, असे शिपाई मारुती भोसले यांनी सांगितले हाेते. त्यासाठी तक्रारदारांकडून ५० हजाराची मागणी केली होती. त्यापैकी ४५ हजार रुपये मारुती भोसले यांनी ऑनलाइन स्वीकारली हाेती.मात्र, ही फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केल्याने तक्रारदाराने मंगळवारी मंडळ अधिकारी अमित शिवगण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व शिपाई मारुती भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी शिगवण यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ही रक्कम त्यांना दिली आणि ते जाळ्यात सापडले. या लाचप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई रत्नागिरी लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस उपअधीक्षक अविनाश पाटील, पाेलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक पाेलिस फाैजदार उदय चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक अबिकर, काॅन्स्टेबल राजेश गावकर, हेमंत पवार, वैशाली धनवडे यांनी केली.

लाचेच्या रकमेचे वाटपलाच घेतलेल्या रकमेतील स्वतःचा हिस्सा १५,५०० रुपये मंडळ अधिकारी शिगवण यांनी स्वतःसाठी ठेवला. उर्वरीत १४,५०० रुपयांचा हिस्सा ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग