शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: नगराध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरला, बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह तीन पदाधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:48 IST

Local Body Election: गणेश पाटील यांच्याकडून कारवाई

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह तुळसीदास पवार, राजेंद्र भुरण यांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. ही कारवाई वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी केली आहे. या कारवाईमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी प्रबळ असलेले उमेदवार लियाकत शाह यांचा अर्ज अवैध ठरला. तर दुसरीकडे शिंदेसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर लियाकत शाह यांनी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.यानंतर काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली हाेती. तर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी, तर चिपळूण प्रभारी शहराध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली.तर बुधवारी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह तुळसीदास पवार, राजेंद्र भुरण या तिघांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. याबाबतचे पत्र तिघांना पाठविण्यात आले असून, याची प्रत काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांना पाठवण्यात आली आहे.पक्षविराेधी कारवाईचा ठपकाचिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई करीत आहात. आपले हे कृत्य पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे, असे वरिष्ठ उपाध्यक्ष पाटील यांनी तिघांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Nomination Invalid, Congress Leaders Suspended for Rebellion

Web Summary : Congress suspended three leaders, including a local president, for six years after rebellion in Chiplun Nagar Parishad election. One leader's nomination was invalid.