लांजात आणखी तीन कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST2021-03-26T04:31:18+5:302021-03-26T04:31:18+5:30

लांजा : तालुक्यात एक दिवस आड करून कोरोना रुग्णांची वाढ होत ...

Three more corona patients in Lanza | लांजात आणखी तीन कोरोना रुग्ण

लांजात आणखी तीन कोरोना रुग्ण

लांजा : तालुक्यात एक दिवस आड करून कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने चिंतेचा विषय आहे. सोमवारी एक आणि बुधवारी दाेन अशा तीन रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

लांजा तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता त्याच आरगाव गावातील २० वर्षीय तरुणाची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली आहे. रिंगणे येथील ४५ वर्षीय प्रौढाची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.

सोमवारी जावडे येथील २७ वर्षीय तरुणाची आरटीपीसीआर चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. तालुक्यात एकूण ५५४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधून ५२८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या तालुक्यात ११ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला आहे.

Web Title: Three more corona patients in Lanza