बोलेराे-दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST2021-07-07T04:39:46+5:302021-07-07T04:39:46+5:30

लांजा : दुचाकी व बोलेरो गाडीमध्ये धडक होऊन बापेरे येथील दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात ...

Three members of the same family were injured in a two-wheeler accident | बोलेराे-दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जखमी

बोलेराे-दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जखमी

लांजा : दुचाकी व बोलेरो गाडीमध्ये धडक होऊन बापेरे येथील दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजता लांजा तालुक्यातील बापेरे गुरववाडी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापेरे गुरववाडी येथील अरुण गणपत गुरव (३५) हे दुचाकी बजाज डिस्कव्हर (एमएच ०८, सीवाय ६१०९), पत्नी आर्या अरुण गुरव (३०), मुलगा अर्णव अरुण गुरव (७) मुलगी आराध्या अरुण गुरव (५) यांना घेऊन बापेरे ते लांजा असे दुचाकीवरून निघाले हाेते. बापेरे गुरववाडी येथे १० वाजण्याच्या दरम्यान ते आले असता लांजाहून बापेरे येथे रूपेश शांताराम गुरव (३२, रा. इसवली) हे बोलेरो गाडी (एमएच ०४, एफयु २७०८) बापेरे येथे बागेतील झाडांना पुरण भरण्यासाठी मजूर घेऊन जात हाेते. त्याचवेळी बोलेरो गाडीच्या उजव्या बाजूच्या हाैद्यावर येऊन दुचाकीची धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर पडले.

या अपघातामध्ये अरुण गुरव त्याची पत्नी आर्या, मुलगा अर्णव हे किरकोळ जखमी झाले तर मुलगी आराध्या हिला कोणतीही इजा झाली नाही. झालेल्या अपघाताची माहिती बोलेरोचालक रूपेश गुरव यांनी पोलीस स्थानकात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर हे करत आहेत.

Web Title: Three members of the same family were injured in a two-wheeler accident