शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: तिघांना मारहाणीत नाहक गोवले; पालक ५ फेबुवारीपासून आमरण उपोषण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:40 IST

परशुराम घाटातील मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी पसारच

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात ६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणात १० संशयितांवर गुन्हा दाखल झाला. या घटनेशी संबंध नसलेल्या ३ तरुणांना नाहक अडकवण्यात आले आहे. यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलिसांनी कार्यवाही केलेली नाही. मुख्य संशयित आरोपींना ५५ दिवसांत अटक झालेली नाही.मात्र सहभाग नसलेल्या मुलांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे या तिन्ही मुलांच्या पालकांनी विविध सेवाभावी संस्थांसह ५ फेबुवारीपासून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शाहनवाज शाह व संशयित आरोपींचे पालक म्हणाले की, परशुराम घाटात झालेल्या मारहाण प्रकरणात १० संशयित आरोपींमध्ये निहाल सईद अलवारे, शहबाज सिद्धीक दळवी, मुझफ्फर इनामदार यांचा समावेश आहे. या तिघांनाही चिपळूण पोलिसांनी ६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १०:४० वाजता त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना अटक झाल्यानंतर तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली. जामीन अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला.संशयितांमधील मुझफ्फर इनामदार परदेशात नोकरी करतो. तो ६ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता चिपळुणात आल्यानंतर रात्री १० पर्यंत घरीच होता. मित्रांसाठी आणलेल्या वस्तू देण्यासाठी तो घराबाहेर पडला. मारहाणीदरम्यान हे तिन्ही तरुण जिथे होते, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. ज्यांचा या घटनेशी संबंध नाही, अशांवर पोलिसांनी कारवाई केली.संशयित सापडत कसे नाहीत?केवळ शाबासकी मिळवण्यासाठी तातडीने ही कारवाई झाली. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व त्याचे साथीदार अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. हे संशयित चिपळुणात येतात, त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि निघून जातात, तरीही पोलिसांना थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे निरपराध तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे. मुलांवरील अत्याचाराची त्रयस्थ समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यासाठी ५ फेब्रुवारीपासून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर तरुणांचे पालक, विविध संस्थांच्या माध्यमातून आमरण उपोषण केले जाणार असल्याची माहिती शाह यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस