शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 16:51 IST

Crimenews Police Ratnagiri : शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले, असे धमकावून दुकानदाराकडून ५ हजार रुपये लुटणाऱ्या तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही चिपळूण तालुक्यातील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देलाचलुचपत विभागाचे अधिकारी सांगून पैसे उकळणाऱ्या तिघांना अटकया टोळक्याने अनेकांना गंडवले

गुहागर : शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले, असे धमकावून दुकानदाराकडून ५ हजार रुपये लुटणाऱ्या तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही चिपळूण तालुक्यातील रहिवासी आहेत.गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागातील वेळणेश्वर, अडूर, बोऱ्या भागात गेल्या दोन दिवसापासून हा प्रकार सुरु होता. तुमचं दुकान अनधिकृतपणे सुरु आहे. तुमच्या दुकानात दारु विकली जाते, शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले? आम्ही अँटी करप्शन ऑफिसकडून आलो आहोत.तुमच्याबाबत काही तक्रारी आल्या आहेत. त्या जर मिटवायच्या असतील तर आम्हाला पैसे द्या, असे सांगत पाच ते दहा हजार रुपये घेत या टोळक्याने अनेकांना गंडवले होते.पिंपर येथील शेखर दत्तात्रय वळंजू यांचे किरणा मालाचे दुकान आहे. दारू पिण्याचा परवाना असून, दुकानात बियर बाटल्या ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजता ईनोवा गाडी (एमएच ०२, सीबी ४२८२) घेऊन तिघेजण आले. त्यांनी बियर बाटली मागितली.

वळंजू यांनी बाटली देताच आपण लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून कारवाई करणार असल्याचे सांगितले़ उद्या कोर्टात यावे लागेल, असे सांगितले. या प्रकाराने घाबरून माझ्यावर केस करू नका, असे सांगितल्यावर १० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीनंतर त्यांनी ५ हजार रूपये दिले.या सर्व प्रकारानंतर वळंजू यांना संशय आल्याने त्यांनी गुहागर पोलीस स्थानकात माहिती दिली. त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर गुहागर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतली आहे़. त्यांच्यावर खंडणी मागणे व खोटे अधिकारी असल्याची बतावणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक कदम करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी