नूतननगर येथे सापडली साडेपाच फुटी घोरपड
By Admin | Updated: October 19, 2014 00:29 IST2014-10-19T00:28:47+5:302014-10-19T00:29:54+5:30
रत्नागिरी : शहरातील नूतननगर परिसरात साडेपाच फुटाची घोरपड सापडली आहे.

नूतननगर येथे सापडली साडेपाच फुटी घोरपड
रत्नागिरी : शहरातील नूतननगर परिसरात साडेपाच फुटाची घोरपड सापडली आहे. सर्पमित्र प्रवीण कदम यांनी ही घोरपड पकडून येथील पानवलच्या जंगलात सोडली.
नूतननगर येथे राहणाऱ्या मकरंद पंडित यांच्या घराच्या परिसरात काल सकाळी साडेपाच फूटी लांबीची घोरपड आढळली. सर्पमित्र प्रवीण कदम यांना बोलावून ती पकडण्यात आली. ९ किलो वजनाची १७ ते १८ वयोगटाची घोरपड असल्याचे कदम यांनी सांगितले. आतापर्यंत अनेकवेळा घोरपडी पकडल्या आहेत. परंतु पंडित यांच्या आवारात सापडलेली घोरपड मोठी असल्याचे सांगितले. पंडित यांच्या आवारात अजूनही काही घोरपडीची पिले आहेत. अधूनमधून ती नजरेस येत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)