‘त्या’ चोरट्यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST2021-03-19T04:31:27+5:302021-03-19T04:31:27+5:30

देवरुख : मोबाइल आणि चैन हिसकावून तरुणाला मारहाण केल्याची घटना देवरुख येथे घडली होती. यातील आरोपींना चार दिवसांची ...

‘Those’ thieves are in judicial custody | ‘त्या’ चोरट्यांना न्यायालयीन कोठडी

‘त्या’ चोरट्यांना न्यायालयीन कोठडी

देवरुख : मोबाइल आणि चैन हिसकावून तरुणाला मारहाण केल्याची घटना देवरुख येथे घडली होती. यातील आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही काेठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवारी देवरुख न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली आहे.

देवरुख पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मा राम उर्फ कोजाराम वीष्णोई (वय १९) आणि हिराराम बाबूराम विष्णोई (वय २५, दाेघे रा. राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. याची फिर्याद एचपी गॅस एजन्सीचे पुष्कर राजेंद्र पाटोळे (वय ३१, रा. देवरुख मराठा कॉलनी) यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली होती. पुष्कर पाटोळे हे गॅस कंपनी चे काम आटपून घरी निघाले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी पुष्करवर हल्ला करून मारहाण केली होती. तसेच गळ्यातील चैन व मोबाइल चोरट्यांनी लंपास केला होता. फिर्यादीनंतर देवरुख पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. त्यानंतर पाठलाग करून काही वेळांतच चोरट्यांना जेरबंद केले हाेते. या दाेघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.

Web Title: ‘Those’ thieves are in judicial custody