शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत चोरट्यांची दहशत, घरात घुसून वृद्धेला गंभीर जखमी करत दागिने केले लंपास

By अरुण आडिवरेकर | Updated: October 31, 2022 17:04 IST

महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले.

रत्नागिरी : घरात एकटी असल्याचा फायदा उठवून चोरट्याने घरात शिरुन वृद्धेच्या डोक्यात लोखंडी सळी मारुन गंभीर जखमी करत अंगावरील दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील नाणीज बस थांब्यानजीक सरोदेवाडी येथे घडला. विजया विलास केतकर (६५) असे जखमी वृद्धेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.विजया केतकर यांच्या पतीचे अपघाती निधन झाले आहे. तर मुले रत्नागिरीला असतात. त्यामुळे त्या घरात एकट्याच असतात. पाळत ठेऊन हा प्रकार घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चोरट्याने मागील दाराने घरात प्रवेश केला. चोरट्याने स्वयंपाक घरात असलेल्या केतकर यांच्या डोक्यात सळीचे दोन प्रहार केले. त्या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळताच चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले, तसेच कपाटातील दागिने असे मिळून सुमारे साडेबारा तोळे दागिने घेऊन पोबारा केला. वृद्धेच्या एका हातातील सोन्याच्या बांगड्या त्याला काढता आल्या नाहीत. तर धावपळीत त्याने रिंगा व किरकोळ दागिने वाटेत टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले.वृद्धेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर त्यांना पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. त्यांना अंमलदार मोहन कांबळे, संतोष कांबळे, राकेश तटकरी व अन्य सहाय्य करीत आहेत. पोलीस पाटील नितीन कांबळे, सरपंच गौरव संसारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताराम खावडकर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस