शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: ‘दृश्यम’ची पुनरावृत्ती; खड्डा खोदून दफन केले, चर्चेला उत आला; पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:17 IST

दोडामार्ग तिलारी रस्त्यावरील प्रकार

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी रस्त्यावरील कुडासा तिठा नजिक असलेल्या साईडपट्टीवर खड्डा खोदून त्यामध्ये काहीतरी दफन करण्यात आले आहे. दफन केल्यानंतर त्यावर फुलांची मोठी रास आणि त्यावर दगड ठेवण्याचा प्रकार उघड झाल्याने दोडामार्ग तालुक्यात विविध चर्चाना उत आला आहे.ही घटना भेडशी येथील युवकांच्या जागृतेमुळे उघड झाली. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी हा खड्डा सकाळी खोदून काय ते पाहू असे सांगितले. दरम्यान मंगळवारी दुपारी याठिकाणी ही दफन केलेली जागा पुन्हा उकरण्यात आल्यानंतर त्यामध्ये मृत पाळीव कुत्रा दफन केल्याचे उघड झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.रविवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी दोन चारचाकी उभ्या असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या काहीजणांनी पाहिले होते. मात्र काही कामानिमित्त थांबले असतील असा त्यांचा समज झाला. सोमवारी दुपारी भेडशी येथील पांडुरंग बेळेकर यांना याठिकाणी काहीतरी पुरुन त्यावर फुले टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नजीकच्या जमीन मालकांकडे चौकशी केली. मात्र त्यांनाही याबाबत काही माहिती नसल्याचे समजले.दरम्यान बेळेकर यांनी ही गोष्ट आपल्याच गावातील काही जणांनां सांगितली. सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नेमका हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी भेडशी येधील पत्रकार जय भोसले, गोविंद शिरसाठ, दादा टोपले आदी ग्रामस्थ यांनी याठिकाणी जात पाहणी केली. सुरुवातीला हा प्रकार देव देवस्कीचा वाटत होता. मात्र नंतर अधिक जवळ जाऊन पाहिले असता याठिकाणी काहीतरी दफन केल्याचे दिसून येत होते.याबाबत तातडीने दोडामार्ग पोलिसांना कळवण्यात आले. तेथील बिट अंमलदार संजय गवस, पोलिस नाईक हे लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही पाहणी करून काहीतरी दफन केल्याचे स्पष्ट केले आणि त्यानंतर खोदकाम करण्यात आले.

कुत्रा पुरल्याचे झाले उघडदुपारी १ वाजन्याच्या सुमारास दोडामार्ग प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, पोलिस निरीक्षक हेमचंद खोपडे व साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, तलाठी, पोलिस पाटील, यांच्या समक्ष खड्डा उघडण्यात आला. खड्डा खोदत असताना कुजलेला वास सर्वत्र पसरू लागला जसजसा खड्डा खोदून झाला तस लोकांच्या नजरा खड्ड्याकडे झूकू लागल्या पाहता तर काय त्याठिकाणी कुत्रा पुरल्याचे उघड झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस