साकवदुरुस्तीस दमडीही नाही

By Admin | Updated: March 7, 2016 00:48 IST2016-03-06T22:06:15+5:302016-03-07T00:48:31+5:30

धोकादायक स्थिती : जिल्ह्यातील गावा-गावातील संपर्क तुटणार!

There is no shortage of sandwiches | साकवदुरुस्तीस दमडीही नाही

साकवदुरुस्तीस दमडीही नाही

रहिम दलाल-- रत्नागिरी  जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६०० साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन त्या साकवांवरुन प्रवास करावा लागत आहे. या साकवांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेली अडीच वर्षे शासनाकडे पडून आहे. त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या साकवांची तालुक्यातून माहिती मागवली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिाकणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावर ग्रामस्थांच्या सोयीसाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे साकव मोडकळीस आल्याने जीव हातात घेऊन ग्रामस्थ त्यावरून ये-जा करतात.
तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या साकवांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडे मागवले होते. जिल्हाभरातून ६०० साकवांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी आले होते. या साकवांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ७८ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार केला होता. मात्र, जिल्हा नियोजन विभागाकडे साकवांच्या दुरुस्तीसाठी तरतूदच नसल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यानंतर अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एप्रिल, २०१३ मध्ये जिल्हा परिषदेने साकव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. अडीच वर्षे उलटली तरी हा दुरुस्तीचा प्रस्ताव धूळखात पडून आहे.
जिल्हा परिषदेने शासनाच्या जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सादर केला होता. तरीही अद्याप साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील ६०० साकव मोडकळीस आलेले आहेत. त्यांना शासनाकडून दमडीही मिळालेली नाही.
तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभाग मोडकळीस आलेल्या साकवांची प्रत्येक तालुक्यातून माहिती गोळा करीत आहे. आधीच नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या साकवांना शासनाकडून निधी मिळालेला नसताना आणखी नादुरुस्त साकवांची माहिती घेऊन ती शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, आधीच मोडकळीस आलेल्या साकवांना दुरुस्तीसाठी अद्याप निधी मिळालेला नाही. त्यानंतर आणखी नादुरुस्त झालेल्या साकवांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


बांधकाम विभाग : तालुक्यातून मागवली माहिती
जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये ओढ्यांवर बांधलेले साकव हाच एकमेव संपर्काचे माध्यम होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्यात या साकवांना खूपच महत्व येते. जिल्ह्यातील जवळपास ६०० साकव मोडकळीस आल्याने ही यंत्रणाच यंदाच्या पावसात बंद पडण्याची भीती आहे. आता जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तालुक्यातून या साकवांची माहिती मागवली आहे.


तालुका नादुरुस्त साकव
मंडणगड २२
दापोली ४३
खेड ८३
चिपळूण ९२
गुहागर ४९
संगमेश्वर ६०
रत्नागिरी ४४
लांजा १०६
राजापूर ७१
एकूण साकव ६००

Web Title: There is no shortage of sandwiches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.