शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ..तर लोकच ठरवतील खरी शिवसेना कोणती, संजय राऊतांचे रोखठोक मत

By मनोज मुळ्ये | Updated: February 17, 2023 14:40 IST

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांना अर्धवटच माहिती, आपल्याकडे बरीच माहिती

रत्नागिरी : सकाळपासून प्रवासात असल्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नेमके काय झाले, याची माहिती आपल्याला नाही. मात्र आमची बाजू सत्याची असल्याने आम्ही घाबरत नाही. जर यंत्रणांना निर्णय देण्यात अडचण असेल, त्यांच्यावर दबाव असेल तर त्यांनी निवडणूक लावावी. खरी शिवसेना कोणती, याचा निर्णय लोकच घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे न जाता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच राहणार आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, सुनावणीत नेमके काय काय झाले, हे आपल्याला अजून समजलेले नाही. आमची बाजू सत्याची आहे. यंत्रणांवर दबाव असल्यामुळे कदाचित त्यांना निर्णय देण्यात अडचण येत असावी. तसे असेल तर त्यांनी निवडणूक लावावी. खरी शिवसेना कोणती, हे लोकांनाच ठरवू दे. पक्षांतर करणारे ४० आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असेही ते म्हणाले.२०२४ साली देशात, राज्यात राजकीय परिवर्तन होईल. रत्नागिरीत २०२४ ला शिवसेनेचाच आमदार असेल, असे ते म्हणाले. यातील ‘च’ वर आपला जोर असल्याचेही त्यांनी लगेचच सांगितले. महाविकास आघाडी त्यात एकत्रच लढेल, असेही ते म्हणाले.फडणवीस यांच्यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडेपहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याकडे बरीच माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्धवटच माहिती आहे. त्यांच्यापेक्षा आपल्याकडे अधिक माहिती आहे. अर्थात काही सत्य आपल्यासोबतच घेऊन जायची असतात, असे सांगून त्यांनी पुढे भाष्य करणे टाळले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSanjay Rautसंजय राऊतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना