शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

सखी मतदान केंद्र ठरले साऱ्यांच्याच आकर्षणाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:17 AM

रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार ...

रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र राखीव ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरीसह इतर पाच विधानसभा मतदार संघात असलेल्या सखी मतदान केंद्रे आकर्षणाचा विषय ठरली. रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्र सुशोभित करण्यात आले होते. या केंद्रात ५६.३७ टक्के मतदान झाले.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या तीन विधानसभा मतदार संघांचा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या १४ लाख ४० हजार इतकी आहे. त्यापैकी सात लाख ३५ हजार ५९७ महिला मतदार आहेत. तर उर्वरित ७ लाख ६ हजार ३१८ पुरूष मतदार आहेत.एकूण लोकसंख्येचा विचार करता महिलांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर मतदारांमध्येही महिलांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कुठल्याही निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे मत निर्णायक ठरत असते. महिला मतदारांची संख्या प्रत्यक्ष मतदानावेळी वाढलेली दिसावी, यासाठी ही निवडणूक आयोगाने महिला मतदारांसाठी विविध सुविधा देऊ केल्या आहेत.याचाच एक भाग म्हणुन महिला मतदारांना आकर्षित करून घ्यावे, या हेतुने प्रत्येक यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले. शहरातील माळनाका भागात असणाºया अ. आ. देसाई हायस्कूल येथे सखी मतदान केंद्र सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्षासह सर्व कर्मचारी महिला नेमण्यात आलेल्या होत्या. या केंद्रावर दिव्यांगांच्या मदतीसाठीही महिला स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती.संपूर्ण मतदान केंद्राला गुलाबी आणि पांढºया रंगाच्या फुग्यांची सजावट करण्यात आलीहोती.याठिकाणी मतदानाचा संदेश देणाºया रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मतदारांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी या केंद्रावर मंडप उभारण्यात आले होते. जिल्ह्यातील अशा सहा सखी मतदान केंद्रावर मंडप तसेच इतर केंद्रावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या केंद्रावरील एकूण ८५५ महिला मतदारांपैकी ४८२ मतदारांनी मतदान केले. चिपळूण येथील ओझरवाडी, लांजा, कणकवलीत कलमठ, कुडाळमध्ये कविलकटे आणि सावंतवाडी येथे सखी मतदान केंद्रे ठेवण्यात आली.