शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ पतन विभागावर धडकले

By शोभना कांबळे | Updated: June 12, 2024 16:15 IST

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. ...

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्यावासीयांच्या डोक्यावर उधाणाची भीती असते. त्यामुळे बंधाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र, निधी मिळूनही मिऱ्या बंधाऱ्याच्या धोकादायक टप्प्याचे काम पावसाळा लागल्यावरही सुरू न झाल्यामुळे मिऱ्या ग्रामस्थांनी पत्तन विभागावर धडक देत गावचे संरक्षण करण्यासाठी बंधाऱ्याचे काम करण्याची मागणी केली. यावेळी पत्तन अधिकाऱ्यांनी यावर लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.मिऱ्या बंधाऱ्याचा पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा अडीचशे मीटरचा टप्पा अपूर्ण आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किलाेमीटरचे काम करण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर हा पक्का बंधारा बांधण्यात येत आहे. साडेतीन किलाेमीटरपैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे.पत्तन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामधील सात धोकादायक क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. समुद्राचा प्रवाह बदलला असल्यामुळे या भागात उधाणाच्या लाटांचा मोठा मारा बसतो. त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन हे पाणी मानवी वस्तीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतच्या टप्प्याचे काम करताना लागणाऱ्या यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरून वाद होता. जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. परंतु, त्याने आता संमती दिली असली तरी समुद्राला उधाण असल्याने बंधाऱ्याचे तळातून खोदकाम करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच हे काम होण्याची शक्यता दिसत आहे.त्यामुळे पावसाळ्यातील संकटाचा सामना कसा करायचा, या भीतीच्या छायेखाली असलेल्या मिऱ्यावासीयांनी मंगळवारी पत्तन विभागाचे अधिकारी साळुंखे यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी साळुंखे यांनी संबंधित ठेकेदार आणि सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन या ग्रामस्थांना दिले. यावेळी मिऱ्या गावातील ग्रामस्थ सुनील कांबळे, नागेश कांबळे, राजू भाटकर, छोट्या भाटकर, बाबू कांबळे, मनोज पानगले, अनिल पानगले, विजय तळेकर, मुरलीधर पन्हळेकर, दत्तगुरू कीर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणRainपाऊस