शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक निकामी झाल्याने ट्रकची कारला धडक, तिघे जागीच ठार, लांजातील आंजणारी पुलावरील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 11:42 IST

अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली

लांजा : सिमेंट घेऊन लांजाहून रत्नागिरीच्या दिशेने जाताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने इर्टिगा कारला ट्रकची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने आंजणारी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात ट्रक चालकासह कारमधील दोघेजण अशा एकूण तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत ट्रक चालक हा लांजा तालुक्यातील पुनस येथील असून, कारमधील चिपळूण येथील रहिवासी आहेत. हा अपघात काल, रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.ट्रक चालक विजय सावंत, कार चालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे (वय ६१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर समीर यांच्या पत्नी समृद्धी शिंदे (२९) आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे (६५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.चिपळूण येथील रहिवाशी असलेले शिंदे कुटुंबीय काल, रविवारी रात्री मालवण येथून चिपळूणकडे चालले होते. तर ट्रक चालक विजय विलास सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमधून सिमेंट घेऊन रत्नागिरी येथून लांजाकडे येत होते. आंजणारी घाट उतरत असताना ट्रक चालक सावंत यांना ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. आंजणारी वरचा स्टॉप या ठिकाणच्या तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाले.याच दरम्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात आराम बसची रहदारी असल्याने ट्रक थांबवणे आव्हान बनले. त्यांनी मोठ्या शिताफीने ट्रक आंजाणारी पुलापर्यंत आणला. मात्र, सिमेंट भरलेले असल्याने आणि तीव्र उतार असल्याने या ठिकाणी समोर आलेल्या इर्टिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली. यात ट्रक चालक विजय सावंत, कार चालक समीर शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले.अपघातानंतर जखमी तसेच मृत प्रवाशांना लांजा पोलीस व ग्रामस्थांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात