रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीतही पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना आणि भाजप युतीने मोठे यश मिळविले. तीन नगर परिषदा आणि तीन नगर पंचायती अशा सहा ठिकाणी युतीचा नगराध्यक्ष झाला आहे, तर एका नगराध्यक्षपदावर महाविकास आघाडीतील काँग्रेसने बाजी मारली आहे. शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या या वर्चस्वाच्या लढाईत शिंदेसेनेने खूप मोठी बाजी मारली आहे.रत्नागिरी नगरपरिषदेच्या ३२ जागांमधील २९ जागा शिवसेना आणि भाजप युतीने जिंकल्या आहेत. नगराध्यक्षपदही युतीकडे आले असून, शिंदेसेनेच्या शिल्पा सुर्वे यांनी उद्धवसेनेच्या शिवानी माने यांचा पराभव केला आहे. चिपळूणमध्ये २८ पैकी १६ जागा युतीला मिळाल्या आहेत. येथे केवळ पाच जागा उद्धवसेनेच्या पदरात पडल्या आहेत. काँग्रेसला तीन, तर दोन्ही राष्ट्रवादींना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. येथे युतीचे उमेश सकपाळ नगराध्यक्ष झाले आहेत. लांजामध्ये १७ पैकी १० जागा जिंकणाऱ्या युतीमधील शिंदेसेनेच्या सावली कुरुप नगराध्यक्ष झाल्या आहेत. देवरूखध्ये भाजपच्या मृणाल शेट्ये नगराध्यक्ष झाल्या असून, १७ पैकी १० जागा महायुतीने मिळविल्या आहेत. उद्धवसेनेला येथे तीन जागांवर समाधान मानावे लागले असून, ४ अपक्ष निवडून आले आहेत.गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप विजयी झाल्या असून, तेथे १७ पैकी १३ जागा जिंकून युतीने सत्ता मिळविली आहे. खेडमध्ये मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वात शिंदेसेना, भाजप युतीने २० पैकी २० जागा जिंकल्या आहेत. तेथे शिंदेसेनेच्या माधवी बुटाला नगराध्यक्ष झाल्या आहेत.
एकमेव राजापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे विजयी झाल्या असून, तेथे युतीचे १० आणि आघाडीचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत.
माजी आमदार पराभूतचिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारे माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष रमेश कदम पराभूत झाले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवसेना आघाडीकडून निवडणूक लढवत होते.
Web Summary : Mahayuti, led by Shinde Sena and BJP, secured victories in Ratnagiri's Nagar Parishad and Panchayat elections. Congress won Rajapur. Shinde Sena triumphed over Uddhav Sena. Former MLA Ramesh Kadam lost in Chiplun.
Web Summary : शिंदे सेना और भाजपा के नेतृत्व वाली महायुति ने रत्नागिरी के नगर परिषद और पंचायत चुनावों में जीत हासिल की। राजापुर में कांग्रेस जीती। शिंदे सेना ने उद्धव सेना पर विजय प्राप्त की। पूर्व विधायक रमेश कदम चिपलूण में हार गए।